Rain Update : अंबा नदीवरील पुलावर पाणी, वाकण-पाली वाहतूक बंद

Raigad

1/8
अंबा नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे सुधागड-पाली तालुक्यातील वाकण-पाली वाहतूक बंद करण्यात आली आहे.
2/8
पाली नजीकच्या अंबा नदीवरील पुलावर पाणी... सुधागड-पाली तालुक्यातील वाकण-पाली वाहतूक बंद ... 
3/8
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आले आहे.
4/8
याचाच परिणाम म्हणून पाली - सुधागड परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पाली ते वाकण दरम्यान असलेल्या अंबा नदीवरील पुलावर पाणी साचले होते. यामुळे, या मार्गावरील वाहतूक ही दुपारपासून बंद करण्यात आली आहे. 
5/8
मंगळवार आणि बुधवार सकाळपासून पाली सुधागड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून मंगळवारी दिवसभरात सुमारे 110 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
6/8
यामुळे, मंगळवारी दुपारपासून या मार्गावरील वाहतूक ही सुमारे 7 तास बंद ठेवण्यात आली होती. यामुळे, या परिसरात राहणाऱ्या रहिवासी आणि विद्यार्थ्यांना अडकून रहावे लागले होते. 
7/8
आज सकाळपासून झालेल्या पावसामुळे दुपारी एक वाजल्यापासून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे, खोपोली आणि रोहा - नागोठणेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
8/8
खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
Sponsored Links by Taboola