Matheran : 'ई - रिक्षे'ची चाचणी आता माथेरानमध्ये होणार
Matheran : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ई- रिक्षेची चाचणी माथेरान येथे लवकरच करण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेले माथेरान हे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड येथील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तर, राज्यातील अनेक पर्यटक हे थंड हवेचे ठिकाणी असलेल्या माथेरानला हजेरी लावत असतात. यामध्ये, माथेरानचे निसर्गरम्य वातावरण घनदाट झाडी, घोडे हे चिमुरड्या बालकांपासून तरुण आणि वृद्धांचे आकर्षण बनले आहे.
माथेरान हे इको- सेन्सिटिव्ह क्षेत्र असल्याने या परिसरात वाहनांना बंदी असल्याने मिनिट्रेन, घोडे आणि हातरिक्षा हे प्रवासाचे साधन आहे. तर वृद्ध आणि ज्येष्ठ पर्यटकांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी हातरिक्षा ओढण्यासाठी किमान तीन व्यक्तींची आवश्यकता असते.
पर्यावरण पूरक असलेली ई- रिक्षा सुरू करण्याची मागणी स्थानिक रहिवासी आणि हातरिक्षा चालकांकडून करण्यात येत होती.
नितीन गडकरी यांनी देखील सुमारे दहा वर्षांपासून हातरिक्षा चालकांकडून करण्यात येणारी 'ई - रिक्षे'ची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला असून संनियंत्रण समिती सदस्य सचिव जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ' ई- रिक्षे' संदर्भात चाचणी पूर्व बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी , माथेरान वनविभागाचे क्षेत्रपाल, मुख्याधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी पद्मश्री बैनागडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये लवकरच 'ई- रिक्षे'ची एक दिवसीय चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले असून तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात येणार आहे. यामुळे, माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी महत्वाच्या निर्णयातील एक टप्पा लवकरच घेण्यात येणार आहे.