Raigad landslide: रायगड: पेण तालुक्यातील चांदेपट्टी येथील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; पाहा फोटो
राज्यभरात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनैसर्गिक आपत्तीत प्रशासकीय यंत्रणा व अधिकारी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर सतर्क झालेले आहेत.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील डोंगर वस्तीतील चांदेपट्टी येथे राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांनी पेण मधील डोंगराळ भागात असलेल्या चांदेपट्टी वाडीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
त्यानंतर नागरिकांना समजावून तहसीलदार, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.
प्रशासनाकडून नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
इर्शाळवाडीच्या घटनेनंतर राज्यातील प्रशासन सतर्क झाले आहे.
धोक्याच्या ठिकाण वाटणाऱ्या जागांवरुन नागरिकांच्या स्थलांतराबाबत निर्णय घेतला जात आहे.
image असाच निर्णय पेण तालुक्यातील चांदेपट्टी भागात घेण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासनासह पोलिसांनी नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी समजूत घातली.