Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत माळीणची पुनरावृत्ती, दरड कोसळून चार जणांचा मृत्यू, 120 ते 130 लोक अडकल्याची भीती

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. इर्शाळवाडी इथे दरड कोसळून यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Irshalwadi Landslide

1/10
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे.
2/10
इर्शाळवाडी इथे दरड कोसळून यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3/10
आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.  
4/10
काल (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.
5/10
120 ते 130 लोक अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे
6/10
इर्शाळगडाच्या पायथ्याशी इरशाळवाडी गाव आहे. आणखी खालच्या बाजूला चौक नावाचे गाव आहे. नेताजी पालकर यांचे मूळ गाव आहे.
7/10
इर्शाळगडच्या पायथ्याला असलेल्या या वाडीत प्रामुख्याने आदिवासी समाजाची वस्ती आहे.
8/10
बचावकार्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे, मदत आणि बचावकार्य सुरु झालं आहे.
9/10
मात्र जोरदार पाऊस आणि वाट निसरडी झाल्यामुळे बचावकार्यात अडचण निर्माण होत आहेत.
10/10
दरम्यान बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ते 45 वर्षांचे होते.
Sponsored Links by Taboola