MLA Yogesh Kadam Accident : कशेडी घाटात टँकरची धडक, गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर; नेमका कसा झाला योगेश कदम यांचा अपघात?

MLA Yogesh Kadam Accident : मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या गाड्यांना अपघात झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जयकुमार गोरे (Jaykumar Gore), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आता आमदारत योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

पोलादपूरजवळ कशेडी घाटात (Kashedi Ghat) चोळई येथे आमदार योगेश कदमांच्या गाडीचा अपघात झाला.
काल (शुक्रवारी) रात्री सव्वादहाच्या सुमारास आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पोलादपूरजवळ रायगड हद्दीत अपघात झाला.
अपघातात योगेश कदम किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली.
यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
कशेडी घाटात टॅंकरनं योगेश कदमांच्या गाडीला जोरात धडक दिली. यात योगेश कदम यांच्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेनंतर टँकरचालक हा पळून गेल्याची माहिती आहे. योगेश कदम हे या अपघातात सुखरुप आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
योगेश कदम हे खेड दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघातून आमदार आहेत. ते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र आहेत.