Raigad: रायगडमधील माथेरान येथे 800 फूट खोल दरीत आढळला मृतदेह!

रायगडमधील माथेरान परिसरात बेपत्ता शानमुगा सुंदरम बालसुब्रमण्यम यांचा मृतदेह 800 फूट खोल दरीत आढळला. ट्रेकिंगला गेल असता घसरून पडल्याचा पोलिसांचा अंदाज.

Continues below advertisement

Raigad, Matheran

Continues below advertisement
1/7
रायगड मधील माथेरान येथे पर्यटनासाठी आलेले कर्नाटकातील बेंगलोरचे 58 वर्षीय शानमुगा सुंदरम बालसुब्रमण्यम हे चार दिवसांपासून बेपत्ता होते.
2/7
अखेर किंग जॉर्ज पॉईंटच्या जवळील सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. सुंदरम हे 15 ऑक्टोबर रोजी ‘वरांडा इन फॉरेस्ट’ हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.
3/7
सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले असता ते परत न आल्याने हॉटेल व्यवस्थापनाने 16 ऑक्टोबर रोजी माथेरान पोलिस ठाण्यात त्यांची मिसिंग म्हणून तक्रार करण्यात आली होती.
4/7
स्थानिक पोलिस आणि स्थानिक रेस्क्यू टीम यांच्याकडून त्यांची शोधमोहीम राबवण्यात आली.त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी किंग जॉर्ज पॉईंटच्या दरीत मृतदेह दिसल्याची माहिती मिळाली.
5/7
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सह्याद्री रेस्क्यू टीम व हेल्प फाउंडेशनच्या मदतीने 19 ऑक्टोबरला शानमुगा सुंदरम बालसुब्रमण्यम यांचा मृतदेह अखेर खोल दरीतून बाहेर काढला.
Continues below advertisement
6/7
मृतदेहाजवळ मिळालेल्या ओळखपत्रावरून हीच हरवलेली व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी माथेरान पोलिसांनी त्यांची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली असून यापुढील अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
7/7
मात्र मृतदेहावर नातेवाईकांच्या उपस्थितीत माथेरान येथीलच स्मशानभूमीत त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Sponsored Links by Taboola