Kashedi Tunnel: कशेडी बोगद्यातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू; पाहा फोटो
कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा (Kashedi Tunnel) वाहतुकीसाठी सुरु होणार आहे.
पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम सुरू आहे.
तयार काँक्रीट रस्त्याला पाणी लागल्यास सिमेंट वाहून जाऊन रस्ता खराब होतो त्याचा दर्जा ढासळतो.
रस्त्याला पावसाचे पाणी लागू नये म्हणून 15 मीटर लांबीचे दोन शेड बनवत काँक्रीटीकरण काम जोरात सुरू आहे.
उल्हासनगरमधील एका कंपनीच्या माध्यमातून हे काम केले जात आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून बोगद्यातील काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
गणेशोत्सवापूर्वीच या बोगद्यातून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न होणार आहे.
नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी अवघड वळणांमुळे जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो.
तर जड वाहनांसाठी जवळपास 40 मिनिटांचा कालावधी लागतो. अवघड वळण घाटातून आहेत त्यामुळे अनेकदा अपघातांचेही प्रसंग ओढवतात