Dasara : कान्होजी आंग्रे घराण्याचे शाही शस्त्रपूजन; 323 वर्षांपासूनची अखंड परंपरा; पाहा फोटो
विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन करण्यात येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा साम्राज्याच्या स्थापनेत शस्त्रांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच होते.
या शस्त्रांच्या माध्यमातून परकियांबरोबर लढाया यशस्वी होउन राजकीय रयतेला सुखाचे आणि आनंदाचे राज्य प्राप्त होऊ शकले.
स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या वंशजांनी आज शस्त्रपूजन केले.
मागील 323 वर्षांपासूनची आंग्रे घराण्यात शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे.
विजयी दशमीच्या दिवशी शस्त्रपूजा करुन त्या शस्त्रांच्याप्रति पवित्र आधारभाव व्यक्त करण्याच्या हेतून सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी ही परंपरा सुरू केली.
विजया दशमीच्या शस्त्रपूजेची परंपरा गेली 323 वर्ष आंग्रे घराण्यात आजही अबाधीत आहे.
दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी रघुजीराजे आंग्रे यांच्या अलिबाग येथील हिराकोट किल्लाशेजारील घेरीया निवास या निवासस्थानी शस्त्रपूजन करण्यात येते.
सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्यापासून प्रत्यक्ष वापरातील आठ पिढ्यांच्या शस्त्रांची प्राचीन परंपरेनुसार विधिवत पूजा करण्यात येते.