PHOTO : संभाजीराजेंनी रायगडवर साजरा केला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव!
देशभरात आज स्वातंत्र्यादिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी नगारखान्यासमोर ध्वजारोहण करुन पोलीस प्रशासन आणि शेकडो शिवभक्तांसह त्यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली.
यावेळी, आपल्या पोस्टमधून छत्रपती संभाजीराजे म्हणतात की, अगणित वीरांच्या बलिदानातून 1947 साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, हे हुतात्मा भगतसिंहांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते.
6 जून 1674 रोजी दुर्गराज रायगडवर सार्वभौम स्वराज्याची स्थापना करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे परचक्रात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकवला, असं संभाजीराजे पुढे लिहितात.
स्वराज्य आणि स्वातंत्र्याचे मूर्तीमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आणि शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे, अशा भावना छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केल्या.
देशभरात विविध ठिकाणी ध्वजारोहण केलं जात असताना संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावर शिवरायांच्या साक्षीने आणि शिवभक्तांच्या उपस्थित स्वातंत्र्यदिन साजरा केला.