Harpreet Singh : पंजाबच्या हरप्रीतने सायकल रिपेअर करता करता बनवलं 'पॅरामोटर ग्लायडर'
सायकल दुरुस्ती करणाऱ्या पंजाबच्या हरप्रीत सिंहला लहानपणापासूनच पायलट होण्याची इच्छा होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरप्रीत सिंहला लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला.
पंजाबच्या फरीदकोटामधील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या हरप्रीतने एक स्वप्न पाहिलं आणि अर्थात हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.
मेहनतीच्या जोरावर हरप्रीतने सायरलची दुरुस्ती करता करता पॅरामोटर ग्लायडर बनवलं आहे.
हरप्रीतला आता इंडियन फ्लाइंग फोर्स पॉण्डिचेरीमध्ये नोकरी मिळाली आहे.
या पॅरोमोटर ग्लायडरच्या माध्यमातून तो लोकांना हवाई सफर घडवत आहे.
हरप्रीतचं आता पुढचं स्वप्न दोन व्यक्तींसाठी 'पॅरामोटर ग्लायडर' बनवण्याचं आहे.
गरिबांना हवाई सफर घडावी यासाठी त्याने खास हे पॅरामोटर ग्लायडर बनवलं आहे.
हरप्रीतने आता गगनभरारी घेतली असली तरी आजही त्याचे पाय जमिनीवरचं आहेत.
हरप्रीत म्हणाला,सायकलचं हॅंडल, लाकडाचे पंख आणि मोटरसायकलच्या इंजिनाचा वापर करत मी पॅरोमोटर ग्लायडर बनवलं आहे.