बारामतीत पार पडला शून्य कचरा विवाह सोहळा
आजवर अनेक प्रकारचे विवाहसोहळे आपण पाहिले मात्र बारामतीत एक अनोखा विवाहसोहळा बारामतीकरांनी अनुभवला. बारामतीत शून्य कचरा विवाह सोहळा पार पडला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामती नगरपालिकेचे कर्मचारी सचिन खोरे यांनी आपल्या विवाहसोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा उत्सर्जित होणार नाही याची काळजी घेत एक वेगळा आदर्श घालून दिला. मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन खोरे यांनी स्वताःच्या लग्नसोहळ्यात एक वेगळा पायंडा पाडला.
एकीकडे मंगलाष्टके व दुसरीकडे स्वच्छतेची शपथ देत सचिन खोरे यांनी आपला विवाह ख-या अर्थाने वेगळा केला. बारामती नगरपालिकेच्या वतीने महेश रोकडे यांनी कार्यभार स्विकारल्यापासून स्वच्छतेबाबत विशेष उपाययोजना सगळीकडे सुरु आहेत.
याच पार्श्वभूमीवर लग्नाच्या माध्यमातूनही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. महेश रोकडे यांच्यासह आरोग्य सभापती सूरज सातव यांच्या हस्ते स्वच्छतादूत प्रमाणपत्र आणि देशी वृक्ष भेट देत सचिन खोरे व कुटुंबियांचा सत्कार केला गेला.
या लग्नात केवळ शून्य कचरा उत्सर्जित होण्यास प्रतिबंध करण्यात आला नाही तर लग्नसोहळ्याला उपस्थित मान्यवरांना स्वच्छतेची शपथही दिली गेली. प्लॅस्टिकचा वापर तसेच कागदी ग्लास किंवा प्लेटचाही वापर केला गेला नाही. प्लॅस्टिक विरहीत असा हा विवाहसोहळा केला गेला.
प्लॅस्टिक हद्दपार करण्याचा प्रयत्न नगर परिषद करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडेयांनी दिली.
या पुढील काळात सर्वच मंगल कार्यालयांमधील प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याबाबत संबंधितांना विनंती करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकनिर्मूलन हा स्वच्छता मोहिमेतील सर्वात महत्वाचा घटक आहे. कचरा विलगीकरणासोबतच प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याबाबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे.