Rohit Pawar : सूर्याच्या पहिल्या किरणाला साक्ष ठेवून आमदार रोहित पवारांचं महादेवाला साकडं, पाहा फोटो...
पहिला टप्पा 11 किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा सात किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली.
आज पहाटे साडेपाच वाजता संगमेश्वराच्या महादेवाला अभिषेक घालून साकडे घालून रोहित पवार यांनी या यात्रेला सुरुवात केली.
यावेळी आमदार अशोक पवार, रोहित पाटील, देवदत्त निकम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
ही यात्रा तुळापूर मार्गे फुलगाव वरून वढू बंधाऱ्यावरून पुढे आली.
दरम्यान पदयात्रेच्या मार्गावरील सैनिकी शाळेतील शंभर मुलांनी रोहित पवार यांचे चित्र काढून रोहित पवार यांच्या युवा यात्रेला युवा संघर्षा यात्रेला पाठिंबा दिला.
आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही 800 किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला 17 ते 18 किलोमीटरचा प्रवास असेल.