पंतप्रधान मोदी, अमित शाहांसह दिग्गजांकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या आठवणींना उजाळा, शेअर केले फोटो!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली - पंतप्रधान मोदी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनानं व्यथित झालोय- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मनाला अतिशय वेदना होत आहेत - देवेंद्र फडणवीस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याकडे रवाना झाले असून सकाळी 6 वाजता राज ठाकरे मुंबईतील निवासस्थानाहून रवाना झाले होते.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाहिली श्रद्धांजली
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते.
रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली.