unmanned boat in pune: शत्रुचा खात्मा करु शकणारी मानव विरहित बोट तुम्ही पाहिलीये का?
समुद्रातील शत्रूंचा खात्मा आणि प्रत्येक हालचाली बसल्याजागी मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात तयार करण्यात आलेल्या या मानव विरहित बोटींमुळं हे शक्य होणार आहे.
पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपनीने अशा मानव विरहित बोटची निर्मिती केली आहे.
मानव विरहित बोट इलेक्ट्रिक आणि मोटारवर चालते. समुद्रात पंचवीस किलोमीटरचं अंतर ती कापू शकते.
एकावेळी दहा ते बारा तास ती प्रवास करते. शिवाय शत्रूंना या बोटीचा थांगपत्ता लागू नये, यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे.
सर्व्हीलंस कॅमेरा आणि शस्त्रासह सुसज्ज असणारी ही मानव विरहित बोट समुद्रात सोडली की तिच्यावर रिमोट, कॉम्प्युटर आणि सॅटेलाईटद्वारे नियंत्रण मिळवता येतं.
ही बोट ज्या ठिकाणी पाण्यावर तरंगते त्या परिसरातील एक किलोमीटरचा 360 डिग्री व्ह्यू आपल्याला टेहळता येतो.
जर एखादी संशयित बोट अथवा हल्लेखोर आढळले तर या कॉम्प्युटरच्या साह्याने त्यांच्यावर फायरिंग करता येतं.