PHOTO : चांदणी चौकातील पूल इतिहासजमा होणार
पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारीच्या रात्री पाडण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारीच्या रात्री पाडण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता पूल पाडण्याचं काम सुरु करण्यात येणार असून ते 2 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे.
त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे.
पुलावर स्फोटकं लावण्याचं काम सुरु आहे.
रात्री दोन वाजता विस्फोट करुन हा पूल पाडण्यात येणार आहे.
1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
इडिफाईस इंजिनियरिंग (Edifice engineering) कंपनीला पूल पाडण्याचं काम देण्यात आलं आहे.
त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर हे काम सुरु आहे.
मध्यरात्री दोन वाजता ब्लास्ट करण्याच्या कामासाठी चारशे मीटरच्या अंतरामध्ये फक्त चार व्यक्ती उपस्थित असणार आहे.