In Pics : पुण्यात महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरवात
पुण्यात रास्तापेठ परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहजारो आंदोलन एकत्र येत घोषणाबाजी करत आहेत.
राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे कामकाज चांगले सुरु असताना राज्य शासनाने एका खासगी कंपनीस वितरण क्षेत्रात समांतर परवाना देण्याचे धोरण अवलंबले आहे.
यास विरोध करण्यासाठी आजपासून वीज कर्मचारी, अभियंते 72 तासांच्या संपावर जाणार आहेत. संपाचा फटका पुणे शहरातील काही भागांना आणि ग्रामीण भागांना फटका बसला आहे.
या संपात पुण्यातील 13 संघटना सहभागी होणार आहेत.
पुण्यातील रास्तापेठ परिसरात 12 ते 6 वाजेपर्यंत आंदोलन होणार आहे. त्यात 4500 कर्मचारी सहभागी होणार आहेत.
त्यासोबतच 1200 कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची सगळे वाट बघत आहेत.