पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यात आलिशान महालांची कमतरता नसली, तरी एका आलिशान राजमहलची चर्चा चांगलीच रंगली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी भाजप आमदार जगदीश मुळीक यांनी आपल्या नवीन घराची झलक ड्रोनमधून शूट केलेल्या व्हिडिओतून दिली आहे.
त्यांनी आपल्या घराचा व्हिडिओ शेअर केला असून एक दिवसात 15 लाख लोकांनी आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे.
अत्यंत प्रशस्त जागेत व्हाईट थीममध्ये हा राजमहल असून पाहता क्षणीच डोळ्यात भरतो.
बंगल्याची झलक पाहिल्यानंतर अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देताना मुळीक यांचे अभिनंदन केलं आहे.
मुळीक यांनी नव्या घराची वास्तूशांती आणि सत्यनारायणाची पूजा घातली.
मुळीक यांच्या नव्या घराच्या वास्तूशांती कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
सीएम फडणवीसांनी सत्यनारायण पूजेचं दर्शन घेत मुळीक कुटुंबाशी संवाद साधला.
पुण्यातील अनेक नेत्यांनी मुळीक यांच्या नव्या घरी भेट देत त्यांचे अभिनंदन केले.
बंगल्यात कॉन्फरन्स हॉलसह पंचतारांकित हॉटेलसारखं इंटिरिअर करण्यात आलं आहे.
जगदीश मुळीक हे भाजप नेते असून त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे.
2014 मध्ये ते पहिल्यांदा वडगाव शेरीमधून आमदार झाले.
2019 मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.