Burning PMPML Bus : पिंपरी चिंचवडमध्ये द बर्निंग बसचा थरार: आग आटोक्यात!

Burning PMPML Bus

1/8
पिंपरी चिंचवडमध्ये 'द बर्निंग बस' चा थरार; अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश!
2/8
पिंपरी चिंचवडमध्ये द बर्निंग बसचा थरार पहायला मिळाला. दापोडीतील मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएल बसला अचानक आग लागली.
3/8
पुण्याहून दापोडीला ही बस येत होती. त्यात वीस ते पंचवीस प्रवासी होते
4/8
मात्र प्रसंगावधान दाखवत चालकाने सर्व प्रवासी खाली उतरवले.
5/8
त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आधी इंजिन मधून धूर आला अन नंतर पेट घेतला.
6/8
तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
7/8
ही बस सीएनजीवर चालणारी असल्याने गॅसच्या टाकीपर्यंत आग पोहचू न देण्याचं आव्हान जवनांसमोर होतं.
8/8
त्यात त्यांना यश मिळालं आणि आग आटोक्यात आली.
Sponsored Links by Taboola