Pune Bus Accident : लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला; 40 प्रवासी असलेली बस दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू
ताम्हाणी घाटाजवळ एक प्रवासी बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 13 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
चाकण येथून महाडला जात असताना आज सकाळच्या सुमारास अपघात घडला. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमध्ये वऱ्हाडी मंडळी होती
प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती थेट दरीत कोसळली.
या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुषांचा समावेश आहे.
ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
ही ट्रॅव्हल्स चाकणवरून महाड वीरवाडीला लग्नाला चालली होती.
काही प्रवासी अद्याप बसमध्ये अडकल्याची माहिती आहे.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 13 जण गंभीर जखमी आहेत.