Pune crime Swargate: दत्तात्रय गाडेला शोधायला पोलिसांनी उसाच्या फडात सोडले कुत्रे; आकाशात ड्रोनच्या घिरट्या, शिरूरमध्ये सर्च ऑपरेशनची A टू Z स्टोरी

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा दत्ता गाडे रहिवासी आहे. याच गावात आरोपी दत्ता गाडे यांचं घर आहे. स्वारगेटमध्ये अत्याचार केल्यानंतर गाडे याने थेट शिरूर गाठले होते अशी माहिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याठिकाणी देखील तपास सुरू आहे. पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आता पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शिरूरमधील ऊसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकांकडून शोध सुरू आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ हे सारखे दिसतात. घटना घडल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून आरोपी गाडे याचा फोन बंद आहे.
गाडे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर याठिकाणी 2 गुन्हे तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात असे एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीने घटना घडल्यानंतर थेट त्याचे गाव शिरूर गाठलं होतं.
शिरूरच्या साळुंखे फार्म हाऊस परिसरात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांसोबतच श्वानपथक देखील आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आलं आहे.
48 तासापासून पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या गुणाट गाव परिसरात आल्याची माहिती आहे.
इतकंच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावले असून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जातो आहे.
आरोपी दत्तात्रय गाडीच्या गावाला छावणीचे स्वरूप आलं आहे. सर्वत्र त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून श्वान पथक-ड्रोनद्वारे शोध सुरु आहे.