Stray Dog Attack: खाऊची पिशवी घेऊन घरी जाणाऱ्या चिमुकलीवर भटके कुत्रे तुटून पडले, भयंकर घटना सीसीटीव्हीत कैद
Stray Dog Attack: या हल्ल्यात मुलगी जखमी झाली. यावेळी चिमुकलीने आरडाओरड केल्याने पालकांनी तात्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले आणि मोठा अनर्थ टळला.
Continues below advertisement
Stray Dog Attack
Continues below advertisement
1/8
पुण्याच्या खेड तालुक्यातील पापळवाडी येथे चिमुकल्या मुलीवर घराच्या अंगणातच भटक्या कुत्र्यांचा टोळीचा हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आहे.
2/8
चिमुकली मुलगी खाऊची पिशवी घेऊन घराकडे जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर झडप घातली.
3/8
या हल्ल्यात मुलगी जखमी झाली. यावेळी चिमुकलीने आरडाओरड केल्याने पालकांनी तात्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले आणि मोठा अनर्थ टळला.
4/8
मात्र गावात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.
5/8
कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Continues below advertisement
6/8
चिमुकलीने आरडाओरड केल्याने पालकांनी तात्काळ धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावले आणि मुलीची सुटका केली.
7/8
अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असल्याने पालकांपुढे आपल्या मुलांना एकटे बाहेर खेळायला पाठवावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
8/8
या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेला तातडीने कारवाई करून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
Published at : 30 Sep 2025 10:32 AM (IST)