ST Bus Fire In Baramati: बारामतीच्या पणदरे खिंडीमध्ये एसटी बसला भीषण आग; काही मिनिटांत फक्त सांगाडा शिल्लक राहिला, PHOTO
ST Bus Fire In Baramati: बारामती तालुक्यातील पणदरे खिंडीमध्ये निरा-बारामती दरम्यान धावणाऱ्या सीएनजी बसला अचानक भीषण आग लागली.
Continues below advertisement

ST Bus Fire In Baramati
Continues below advertisement
1/6
ST Bus Fire In Baramati: बारामती तालुक्यातील पणदरे खिंडीमध्ये निरा-बारामती दरम्यान धावणाऱ्या सीएनजी बसला अचानक भीषण आग लागली.
2/6
ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
3/6
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बस पणदरे खिंडीतून निरेकड़े जात असताना अचानक बसमधून धूर निघू लागला.
4/6
चालकाच्या आणि प्रवाशांच्या ही गोष्ट वेळेत लक्षात आल्यामुळे बस तातडीने थांबवण्यात आली. बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने आणि सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. सुदैवाने जीवितहानी टळली.
5/6
या भीषण आगीमध्ये एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले असून बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. मात्र, सुदैवाने चालक, वाहक आणि सर्व प्रवाशांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Continues below advertisement
6/6
सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
Published at : 18 Jun 2026 08:00 AM (IST)