Pune News : सारसबाग परिसरातील महालक्ष्मी देवीला नेसवली तब्बल 16 किलो सोन्याची साडी, सुवर्णवस्त्रातील महालक्ष्मीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Pune News : देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे.

Continues below advertisement

Pune News

Continues below advertisement
1/6
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे.
2/6
दक्षिण भारतातील कारागिरांनी सोन्याची साडी साकारली होती. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.
3/6
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वषार्तून दोनदा ही साडी नेसवली जाते.
4/6
पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे, याकरिता दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते.
5/6
सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे.
Continues below advertisement
6/6
आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते.
Sponsored Links by Taboola