Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Pune News: संबंधित महिलेने नदीपात्रात कधी आणि कोणत्या कारणाने उडी मारली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
Continues below advertisement
Pune News
Continues below advertisement
1/8
दापोडी येथील मुळा नदीच्या पात्रात आज दुपारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
2/8
आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
3/8
नदीपात्रात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
4/8
अग्निशमन दलाच्या 'जलपरी' या विशेष रेस्क्यू वाहनासह जवानांनी अथक प्रयत्नानंतर मृतदेह नदीपात्राबाहेर काढला.
5/8
संबंधित महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली की ही घटना काही वेगळी आहे? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
Continues below advertisement
6/8
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
7/8
महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून, दापोडी पोलीस परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करत आहेत.
8/8
या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करत असून, महिलेची ओळख पटल्यानंतर या प्रकरणातील गुढ उकलण्याची शक्यता आहे.
Published at : 17 Mar 2026 03:00 PM (IST)
Tags :
PUNE NEWS= 8">