Pune news : नदी सुधार प्रकल्पाच्या कामादरम्यान सापडलं शिवलिंग आणि जुनं पिस्तुल
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयादरम्यान पुणे शहरातील नदीपात्रातील भागांमध्ये साफसफाईचे काम सुरु करण्यात आले
साफसफाई दरम्यान अनेक ठिकाणी खोदकाम देखील होत आहे.
खाणकाम करत असताना संगमवाडी परिसरामध्ये आता जुने पिस्तोल आणि शिवलिंग सापडल्याने अनेक ऐतिहासिक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
आज सकाळी शनिवार वाडा परिसरामध्ये असणाऱ्या नदीपात्रातील बडी दर्गाह जवळ एक जुनी समाधी सापडली होती या ठिकाणी पोलिसांनी जाऊन देखील तपासणी करत तिथे नेमकं काय आहे हे पाहिलं होतं
परंतु त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून नारायणेश्वर मंदिर आहे असं देखील काही लोकांकडून सांगण्यात येत होतं.
त्यामुळे आता पुन्हा एकदा तो वाद निर्माण होऊ शकतो अशी शक्यता असतानाच संगमवाडी परिसरामध्ये देखील जुनी शिवलिंगाची मूर्ती पितळ्याची बादली आणि एक अतिशय जुनी पिस्तोल सापडल्यामुळे अनेक चर्चा घडत असलेल्या पाहायला मिळत आहेत.