91 स्वराज्यरथांसह पुण्यात अवतरली शिवशाही; पाहा साहसी खेळाचे खास फोटो...
शिवजयंती निमित्त शिवरायांना भव्यदिव्य मानवंदना दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 91 स्वराज्यरथांसह पुण्यात शिवशाही पुण्याच्या रस्त्यावर अवतरली होती.
फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे 91 स्वराज्यरथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील 51 रणरागिणींच्या मर्दानी खेळाद्वारे चित्तथरारक मानवंदना देण्यात आली.
51 रणशिंगांची ललकारी, नादब्रह्म ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.
शिवजयंती महोत्सव समिती तर्फे लालमहाल पासून आयोजित 'शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा' या भव्यदिव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
मिरवणुकीचे उद्घाटन शिवरायांचे वंशज आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते झालं.
मिरवणुकीचे यंदा 11 वं वर्ष आहे.
शिवजयंती महोत्सव समिती तर्फे लालमहाल येथून स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत ९१ स्वराज्यरथांनी सहभाग घेतला. यावेळी शिवकालीन मर्दानी खेळ सादर झाले.