Rahul Solapurkar: अखेर अभिनेता राहुल सोलापूरकरचा राजीनामा; लोकं रस्त्यावर, नेत्यांनी इशारा दिल्यानंतर उपरती

Rahul Solapurkar: अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

Rahul solapurkar resigne

1/7
अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांकडूनही सोलापूरकरच्या वक्तव्यावर टीका करताना त्याला जिथं दिसेल तिथं बदडा अशी भावना व्यक्त करण्यात आली.
2/7
राहुल सोलापूरकर ज्या ज्या संस्थांवर आहेत, तिथून त्याचा राजीनामा घ्या, त्याला कुठेही अभिनयाचं काम देऊ नका, अशा मागणीसह पुणेकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
3/7
आता, राहूल सोलापुरकर यांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजिनामा दिला आहे. भांडारकर संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष नंदकुमार फडके यांच्या कार्यालयात राहूल सोलापुरकर यांनी राजिनामा पाठवून दिलाय.
4/7
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राहूल सोलापूरकर यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदावरुन त्यांना हटवण्याची मागणी काही संघटनांकडून होत होती.
5/7
अखेर वाढता विरोध आणि शिवभक्तांची नाराजी लक्षात घेऊन राहुल सोलापूरवर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर अभिनेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला.
6/7
भारतातील वैज्ञानिक ओरिएंटोलॉजीचे अग्रणी प्रणेते रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांच्या नावाचे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी 6 जुलै 1917 रोजी पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली.
7/7
पूर्वेकडील, विशेषतः भारतात निर्माण झालेल्या सर्वसमावेशक ज्ञानाबद्दल जगाला माहिती देण्याच्या उद्देशाने ही संस्था ओरिएंटोलॉजीच्या क्षेत्रातील संशोधन कार्यात काम करते.
Sponsored Links by Taboola