Bacchu Kadu : अपना भिडू बच्चू कडू! बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार? पुण्यातील बॅनरची चर्चा
राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमानहानीच्या खटल्यात सुरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे.
पण 2 वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याचे पडसाद शुक्रवारी देशभर उमटल्याचे पाहिला मिळाले. तसेच देशातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला.
दरम्यान आता याचे पडसाद पुण्यात पाहायला मिळत आहेत. पुण्यात आज शनिवारी राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
आता त्यांची आमदारकी कधी रद्द होणार असा सवाल बॅनर वरून विचारला आहे.
अपना भिडू! बच्चू कडू! आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.
त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान असं बॅनरवर लिहिले आहे.