पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार

पुण्यातील वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात ही चिंताजनक बाब बनली आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वीच पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताने ते पुन्हा अधोरेखीत झाले.

Continues below advertisement

Pune traffice police rule

Continues below advertisement
1/8
पुण्यातील वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात ही चिंताजनक बाब बनली आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वीच पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताने ते पुन्हा अधोरेखीत झाले.
2/8
नवले ब्रिजवर झालेल्या कंटेनरच्या अपघातात 8 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला. त्यानंतर, प्रशासनाने येथील मार्गावरुन वाहतुकीसाठी वेग मर्यादा निश्चित केली होती.
3/8
प्रशासनाच्या बैठकीनंतर नवले ब्रिजवरील वाहतूक मार्गावरुन वेग मर्यादा 30 किमी प्रतितास वेग निश्चित करण्यात आली आहे. तसेच, आणखी एका मार्गावर अशीच मर्यादा लावण्यात आली आहे.
4/8
पुणे-मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बायपास मार्गावर होणारे वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
5/8
कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.
Continues below advertisement
6/8
या आधी फक्त नवले पुलावर वेगमर्यादा ठरवण्यात आली होती. आता भूमकर चौक ते नवले ब्रीजपर्यंत ही वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे.
7/8
पोलीस प्रशासनाकडून हा नवीन आदेश दिनांक 25 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येत आहे. या नव्या वेगमर्यादेमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
8/8
दरम्यान, पोलिसांनी घालून दिलेल्या या वेगमर्यादेचे, तसेच वाहतूक नियमांच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई होणार असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे.
Sponsored Links by Taboola