Pune News : विनापरवाना शो रूमवर महापालिकेचा हातोडा; एक लाख चौरस फुट बांधकाम पाडलं!
मुंबई पुणे महामार्ग वरील विनापरवाना शो रूम, फर्निचर मॉलवर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्यावतीने जोरदार कारवाई करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कारवाईत सुमारे एक लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.
हे बांधकाम एचईएमआरएल या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण येत होता.
या बाबत इचईएमआरएलकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
पुढील आठवड्यात उर्वरित दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे.
यावेळी जेडब्ल्यूए कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अन्य कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ यांनी पूर्ण केली