Dattatray Gade Swargate Bus Stand Case : पुण्यातील नराधम दत्तात्रय गाडेचं शिरुरमधील दोन आमदारांशी कनेक्शन, एकाचा फोटो डीपीला, दुसऱ्याच्या बॅनरवर फोटो

दरम्यान बलात्कार करणारा नराधम हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारचा कार्यकर्ता म्हणून मिरवत असल्याचं समोर आले आहे.

Dattatray Gade Swargate bus Stand case

1/12
पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे.
2/12
या प्रकरणानंतर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ही घटना संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
3/12
दरम्यान बलात्कार करणारा नराधम हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारचा कार्यकर्ता म्हणून मिरवत असल्याचं समोर आले आहे.
4/12
आरोपी शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.
5/12
यासोबत शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडे याचा फोटो दिसत आहे.
6/12
अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या फ्लेक्सवर गाडे याचा फोटो आल्यानं आरोपी दत्ता गाडे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
7/12
दरम्यान, शिरूरचे आमदार माऊली कटके यांनी याबाबत खुलासा केला आहे.
8/12
पुढे ते म्हणाले, मतदारसंघांतील 10 हजार पेक्षा जास्त लोकांना देवदर्शन करून मी आणलं आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात.
9/12
शेवटी ते म्हणाले, त्यामुळे माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा माझा संबंध नाही.माध्यमांमधे सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत.
10/12
तरुणीवरील अत्याचाराला 48 तास उलटून गेल्यानंतरही दत्तात्रय गाडे फरार आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
11/12
दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.
12/12
दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 7 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत.
Sponsored Links by Taboola