Pune Supriya Sule Protest : रस्त्याची दुरावस्था, भर उन्हात सुप्रिया सुळेंचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेमुदत धरणे आंदोलन, पाहा फोटो
Pune Supriya Sule Protest : पुण्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याच्या दूरवस्थेवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत.
Continues below advertisement
Pune Supriya Sule Protest
Continues below advertisement
1/9
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (बुधवारी) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केलं आहे.
2/9
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
3/9
या रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केलं आहे.
4/9
सुप्रिया सुळे यांनी आज (दि. 9 एप्रिल) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की आम्ही रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करतो आहोत पण याची दखल घेतली जात नाही, तारीख पे तारीख दिली जात आहे. असं त्यांनी सांगितले.
5/9
गेल्या साडे चार तासांपासून भर उन्हात सुप्रिया सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. सुप्रिया सुळे धरणे आंदोलनावर ठाम आहेत.
Continues below advertisement
6/9
सातत्याने पाठपुरावा करुनही बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचं क्राँक्रिटीकरण झालेलं नाही. यामुळे हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली आहे.
7/9
खासदार सुप्रिया सुळे यांच्या धरणे आंदोलन स्थळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी भेटायला येणार आहेत. तर एक 700 मीटर रोडचा विषय आहे. जिल्हा परिषद आणि पीएमआरडीए संबंधित तो रोड आहे दोन्ही विभागाचे अहवाल आमच्याकडे आले आहेत ते अहवाल आम्ही खासदारांना दाखवले आहेत.
8/9
खासदारांना याबाबतीत उत्तर आणि माहिती दिली जाईल. पीएमआरडीए आणि प्रशासन यावर काम करत आहे. या आधी देखील निवेदन त्यांनी दिलं आहे, या कामाची गांभीर्याने दखल घेतली आहे.
9/9
त्या रोडचं इस्टिमेट तयार झाला आहे, सरकारकडे सबमिट देखील केल आहे पुढची प्रक्रिया सुरू केली आहे, मी इथून जाऊन त्यांना भेटणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
Published at : 09 Apr 2025 04:09 PM (IST)