Pune Rain Update : धुव्वाधार पावसाने हिंजवडीतील आयटीवाल्यांची उडाली दाणादाण; 10 मिनिटात रस्ते पाण्याखाली, गाड्या ढकलत नेण्याची वेळ, पाहा PHOTOS

Pune Rain Update : शनिवारी सकाळी पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

Pune Rain Update

1/10
राज्याच्या काही भागांमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.
2/10
शनिवारी (दि. 07) सकाळी पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कचा परिसर अक्षरशः ‘वॉटर पार्क’मध्ये बदलला.
3/10
फक्त 10 मिनिटांच्या पावसातच हिंजवडीमधील रस्ते जलमय झाले.
4/10
तर काही ठिकाणी इतकं पाणी साचलं की दुचाकी वाहनेही त्यात वाहून गेली.
5/10
रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
6/10
काही मिनिटांच्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्यामुळे प्रशासनाची तयारी अपुरी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
7/10
पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नाही.
8/10
त्यामुळे आज आयटी पार्क हिंजवडी वॉटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढावली, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
9/10
तर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लांडेवाडी आणि भोसरी एमआयडीसी हद्दीत देखील पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले.
10/10
नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
Sponsored Links by Taboola