Pune Rain News: पिंपरी चिंचवडमधील वसाहतींमध्ये पाण्याचा शिरकाव; 2000 नागरिक स्थलांतरित

Pune Rain News: संजय गांधी नगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, जाधव घाट, किवळे या वसाहतीत पाण्याने शिरकाव केला आहे.

Pune Rain News

1/7
पिंपरी चिंचवडच्या विविध भागांतील दोन हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. मात्र अद्याप ही पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पात्रालगतील नागरिक जीव धोक्यात घालून राहताना दिसत आहेत.
2/7
पिंपरी चिंचवडमधील वसाहतींमध्ये नदीपात्रातील पाण्याचा शिरकाव झाला आहे, त्यामुळे 2000 नागरिकांना स्थलांतरित केले आहेत.
3/7
संजय गांधी नगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, जाधव घाट, किवळे या वसाहतीत पाण्याने शिरकाव केला आहे.
4/7
अनेकांच्या घरात आत्ता ही पाणी साचलेलं आहे. सध्या पवना धरणातून 15 हजार 700 क्यूसेक इतका विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर वाढला तर परिस्थिती आणखी बदलणार आहे.
5/7
अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे, घरामध्ये पाणी शिरलं आहे. रात्री 12 वाजल्यापासून पाणी घरांमध्ये घुसायला सुरूवात झाली आहे.
6/7
परिसरामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला तर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे, मात्र काहीजण अद्यापही नदी पात्रालगतील नागरिक जीव धोक्यात घालून राहत आहेत.
7/7
महात्मा ज्योतीबा फुले शाळेत या नागरिकांना राहण्याची सोय करण्यात आली आहे.
Sponsored Links by Taboola