Pune News: पुणे पोलिसांचा मनमानी कारभार? मॅरेथॉनसाठी पाषाण, बाणेर, शिवाजीनगर, बावधनमधील रस्ते बंद, पहाटे चारपासून लोक खोळंबले, काही जणांचे फ्लाईटही मीस

Pune News: जवळपास पहाटेच्या चार वाजल्यापासून लोक याठिकाणी थांबले आहेत. याबाबतची कोणतीही माहिती आधी दिली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Pune News

1/6
पुणे पोलीसांच्या मनमानी कारभारामुळे पुण्यातील पाषाण, बाणेर , शिवाजीनगर , बावधन भागातील रस्ते पहाटे साडे चार वाजल्यापासून बंद ठेवण्यात आले आहेत.
2/6
पोलीस डिपार्टमेंट , वन विभाग आणि एका खाजगी संस्थेकडून वृक्षाथॉन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
3/6
मात्र या प्रमुख रस्त्यांवर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची कोणतीही माहिती नागरिकांनी देण्यात आली नव्हती.
4/6
ज्यांना हॉस्पीटल इमर्जन्सी आहे अशा लोकांनाही पोलीस जाऊ देत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.‌ काही लोकांची फ्लाईट मीस झाल्या आहेत.
5/6
जवळपास पहाटेच्या चार वाजल्यापासून लोक याठिकाणी थांबले आहेत. याबाबतची कोणतीही माहिती आधी दिली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
6/6
पर्यायी मार्ग त्यांनी द्यायला हवे, आणि या मॅरेथॉनचं आयोजन करणाऱ्यांनी याबाबतची पुर्वसूचना द्यायला हवी होती, अशी तक्रार देखील पहाटेपासून थांबलेल्या या नागरिकांनी केली आहे.
Sponsored Links by Taboola