Pune News : विजयादशमीनिमित्त श्री महालक्ष्मी देवीला तब्बल 16 किलोची सोन्याची साडी परिधान, पाहा फोटो...
पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली आहे..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते.
मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी यावेळी उपस्थित होते.
दक्षिण भारतातील कारागिरांनी 21 वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे 6 महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते.
देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल 16 किलो वजनाची आहे.
दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते.
आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली जाते.