Pune News: माऊलींच्या समाधीवर भाविकाने ठेवले पैसे! पुजाऱ्याचा ताबडतोब रकमेवर डल्ला; घटना CCTV मध्ये कैद
Pune News: देवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात काम करणाऱ्या कर्मचारी आणि पुजाऱ्याने गैरवर्तन केल्यामुळे त्यांना निलंबित करत घरचा रस्ता दाखवण्यात आला.
Pune News
1/6
देवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात काम करणाऱ्या कर्मचारी आणि पुजाऱ्याने गैरवर्तन केल्यामुळे त्यांना निलंबित करत घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
2/6
मंदिरातील कर्मचारी पुरुषोत्तम डहाके याने मद्यप्राशन करून हातात टोकदार वस्तू घेत मंदिर परिसरातील कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दमदाटी केली होती.
3/6
तर दुसऱ्या घटनेत माऊलींच्या समाधीवर भाविकांनी ठेवलेले पैसे पुजारी यशोदीप जोशी याने स्वतः च्या खिशात घातले होते, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली होती.
4/6
यापूर्वी देखील असे प्रकार घडले होते. मात्र, त्यावर माफीनामा घेत समज बजावण्यात येत होते, आताच्या या प्रकरणात या कर्मचारी आणि पुजाऱ्यावर आळंदी देवस्थान कमिटीने निलंबनाची कारवाई केली आहे.
5/6
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे,
6/6
मंदिरामध्ये केलेल्या या गैरवर्तन केल्याने त्यांना निलंबित करत घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Published at : 03 Apr 2025 01:59 PM (IST)