Pune News : पुण्यात भरली पाणी पुरी खाण्याची स्पर्धा; तीन हजाराहून अधिक महिलांनी फस्त केली 5 हजार प्लेट पाणी पुरी
पुण्यात पाणी पुरी खाण्याची अनोखी स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुटुंबाची जडणघडण करीत संस्कारांसह चांगले नागरिक घडविण्याकरिता सतत तत्पर असलेल्या घरातील महिलांसाठी म्हणजेच अगदी नाती पासून ते आजी पर्यंत सर्वांसाठी पुण्यामध्ये पाणी पुरी खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कसबा पेठेत झालेल्या या स्पर्धेत 3 हजार 500 महिलांनी सहभाग घेत चक्क 5 हजार प्लेट पाणीपुरी फस्त केली.
प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे कसबा पेठेतील आर.सी.एम.गुजराथी हायस्कूल येथे महिलांसाठी पाणी पुरी खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अगदी सहा वर्षाच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजींपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.
महिलांना मनसोक्त पाणी पुरी खाण्याचा आनंद मिळावा, याकरीता हा उपक्रम राबविण्यात आला.
सर्वसामान्य महिला चूल आणि मुल यासोबतच आपले कुटुंब याभोवती बहुतांश वेळ असतात. त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद देता यावा आणि सर्व वयोगटातील, क्षेत्रातील महिलांनी एकत्र यावे,
यासाठी स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विविध प्रकारचे लकी ड्रॉ व बक्षीसे देखील देण्यात आली.