Pune News: पुण्यात भर रस्त्यावर मानवी सांगाडा; पोलिसांची उडाली धांदल, नेमकं काय घडलं?
Pune News: पुण्यात अगदी रहदारीच्या भागात, भर चौकात मानवी सांगाडा आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् धावपळ उडाली.
Pune News
1/6
पुण्यात अगदी रहदारीच्या भागात, भर चौकात "मानवी सांगाडा" आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् धावपळ उडाली.
2/6
सदर सगळा प्रकार गुरुवारी (21 ऑगस्ट) संध्याकाळी पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली.
3/6
पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या या चौकात मध्यभागी मानवी हाडाचा सांगाडा पडला असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. हाडांचा सांगाडा डोके, धड आणि कमरेपर्यंत होता.
4/6
रस्त्याच्या मध्यभागी असलेला सांगाडा मोठ्या रहदारीमुळे लक्षात न आल्यामुळे काही चार चाकी वाहने त्याच्यावरून गेली.
5/6
काही नागरिकांनी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच पोलिसांनी जागेवर जाऊन तो मानवी सांगाडा ताब्यात घेतला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला.
6/6
पोलिसांनी हा सांगाडा व्यवस्थित तपासला असता तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणि तारेचा वापर करून बनवलेला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
Published at : 22 Aug 2025 09:34 AM (IST)