Pune News : देव तारी त्याला कोण मारी; तिसऱ्या मजल्यावरून लटकलेल्या चिमुकलीसाठी देवदूत ठरला जवान; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Pune News : पुण्यात चार वर्षाच्या लहान मुलीला घरात बंद करुन जाणं जिवावर बेतलं असतं. अग्निशमन दलातील जवानाच्या समयसुचकतेमुळे मुलीचे प्राण वाचले आहेत.

Pune News

1/7
पुण्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रिलच्या पोकळीतून बाहेर गेलेल्या चार वर्षांच्या मुलीचे प्राण थोडक्यात बचावले. यामुळे कुटुंबाचा जीव भांड्यात पडला. यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाचे आभार मानले जात आहेत.
2/7
पुण्यात चार वर्षांच्या मुलीचा जीव थोडक्यात वाचला. संबंधित चिमुकली तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडणार होती. मात्र अग्निशमन दलातील जवान योगेश अर्जुन चव्हाण यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.
3/7
सकाळी 9 वाजून सहा मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. पुण्यातील कात्रज भागातील गुजर निंबाळकरवाडी खोपडे नगर येथे सोनवणे बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला.
4/7
उमेश सुतार नावाच्या व्यक्तीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून अग्निशमन दलातील जवान योगेश चव्हाण धावत बाहेर आले. त्यांनी गॅलरीत येऊन पाहिले. त्यावेळी भाविका चांदणे नावाची चार वर्षांची मुलगी खिडकीत अडकली होती. घरात कोणीच नव्हते. तिची आई मोठ्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती.
5/7
अग्निशमन दलातील जवान योगेश चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता चिमुरडी अडकलेल्या घराकडे धाव घेतली. ते तात्काळ तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. मात्र घराला कुलूप होतं. आई येईपर्यंत त्यांनी वाट पाहिली. आईने दरवाजा उघडताच योगेश यांनी मुलीला खिडकीतून आत ओढले, आणि तिचा जीव वाचवला.
6/7
योगेश चव्हाण यांनी त्या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "मी पाहिल्यानंतर सोनवणे बिल्डिंगकडे धाव घेतली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो, खिडकीत अडकलेल्या चिमुकलीच्या आईकडून चावी घेतली, दरवाजा पटापट उघडून त्या मुलीला बेडरुमच्या खिडकीतून घरात खेचून घेतले आणि तिचा जीव वाचवला."
7/7
योगेश चव्हाण हे अग्निशमन दल, पुणे येथे काम करतात. त्यांच्या या धाडसी कार्यामुळे एका लहानगीचा जीव वाचला. मात्र पालकांनी आपल्या लेकरांच्या बाबतीत हलगर्जी बाळगू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Sponsored Links by Taboola