Pune Accident :पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात, मुंबईच्या दिशेने जाणारा कोळशाने भरलेला ट्रक पलटी
मुंबई-बंगळूरू महामार्गावर पुण्यातील नऱ्हे परिसरात असलेल्या नवले पुलावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. नवले पुलाजवळील भूमकर पुलावर दगडी कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा अपघात सकाळी (सोमवारी) साडेदहाच्या सुमारास घडला आहे. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास कोळसा वाहून नेणारा कंटेनर साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता.
मुंबई-बंगळूरू महामार्गावरील भूमकर पुलाजवळ येताच कंटेनर लोखंडी दुभाजकाला धडकला. त्यामुळे कंटेनर दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जाऊन उलटला आहे.
यामध्ये चालक जखमी झाला आहे. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंटेनर पलटी झाल्यामुळे कोळसा महामार्गावर पसरला आहे.