Pune news : पुणे महापालिका अतिक्रमण विभाग कारवाई वेळी सुरक्षारक्षकाला मारहाण
मागील काही दिवसांपासून पुण्यात अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत अनेक परिसरांमध्ये अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
याच कारवाई दरम्यान पुणे महापालिका सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
कारवाई करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांकडून मारहाण करण्यात आली आहे.
पुण्यात अनेक ठिकाणी अतिक्रमण विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
त्यामुळे शहरातील अनेक परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.
रस्त्यांवरील दुकानं, अवैध बांधकाम, फेरीवाले आणि हॉकर्स यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे.
त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना मारहाण करण्यात आली आहे. या स्थानिकांवर आता पोलीस कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
या मारहाणीची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.