Pune Metro : आली रे आली मेट्रो आली! शिवाजीनगर ते रुबी हॉलपर्यंत मेट्रोची चाचणी यशस्वी; पाहा ड्रोन फोटो...
पुणे मेट्रोची सोमवारी शिवाजीनगर कोर्ट ते रुबी हॉल स्थानकांदरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळे एप्रिलअखेर या मार्गावरील सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मेट्रोच्या प्रवाशांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
पुणे मेट्रोची शिवाजीनगर स्थानक ते रुबी हॉल स्थानकापर्यंतची चाचणी सोमवारी दुपारी घेण्यात आली.
मेट्रोने दिवाणी न्यायालय (शिवाजीनगर) स्थानकावरून दुपारी 3:50 वाजता सुटली 4:07 वाजता रुबी हॉल स्थानकावर पोहोचले. या मेट्रोचा वेग ताशी 10 किमी होता.
संगम पुलाजवळ मुळा-मुठा नदी ओलांडल्यानंतर मेट्रो मंगळवार पेठ (आरटीओ) स्थानकावर पोहोचली.
तेथून मेट्रोने पुणे रेल्वे स्टेशन पार केले आणि वेळापत्रकानुसार रुबी हॉल स्टेशनवर पोहोचली
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) स्टेशन ते फुगेवाडी स्टेशन आणि वनाज स्टेशन ते गरवारे कॉलेज स्टेशन पर्यंत 12 किमीचा मार्ग 2022 मध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.
फुगेवाडी स्टेशन - शिवाजीनगर कोर्ट स्टेशन आणि गरवारे कॉलेज स्टेशन - शिवाजीनगर कोर्ट स्टेशन - रुबी हॉल स्टेशन मार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुले केले जाईल.