Pune Leopard Attack: ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
Pune Leopard Attack: मग शेवटी दोन शार्प शूटरने या बिबट्यावरती तीन राऊँड फायर केले, यात बिबट्या ठार झाला. ६ वर्ष वयाचा नर जातीचा हा नरभक्षक बिबट्या आहे.
Continues below advertisement
Pune Leopard Attack
Continues below advertisement
1/9
पुणे: अखेर शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला (Pune Leopard Attack) यश आलं आहे, रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना वन विभागाला हा बिबट्या ड्रोनमध्ये दिसला.
2/9
नंतर या बिबट्याला पकडण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न केला गेला, डार्ट मिस झाला. मात्र यामुळं सावध झालेल्या बिबट्याने थेट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती प्रतिहल्ला (Pune Leopard Attack) करण्याचा प्रयत्न केला.
3/9
मग शेवटी दोन शार्प शूटरने या बिबट्यावरती तीन राऊँड फायर केले, यात बिबट्या ठार झाला. ६ वर्ष वयाचा नर जातीचा हा नरभक्षक बिबट्या आहे.
4/9
13 वर्षीय रोहनचा जीव ज्या ठिकाणी घेतला तिथून 400 मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आलं. हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं त्याच्या नमुन्यांवर आणि ठस्यांवरून स्पष्ट झालं आहे.(Pune Leopard Attack) पिंपरखेड व परिसरामध्ये मागील वीस दिवसांमध्ये दिनांक १२ ऑक्टोंबरला शिवन्या शैलेश बोंबे, वय ५ वर्ष ६ महिने, दिनांक २२ ऑक्टोंबरला भागुबाई रंगनाथ जाधव, वय ८२ वर्षे आणि रोहन विलास बोंबे वय १३ वर्षे यांचे दुर्दैवी मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाल्याने मोठ्या प्रमाणात संताप उसळला होता.
5/9
जुन्नर,शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ १२ ऑक्टोंबरला व २२ ऑक्टोंबरला पंचतळे येथे बेल्हे जेजुरी राज्यमार्ग रोखून तसेच दिनांक ३ नोव्हेंबरला मंचर येथे पुणे नाशिक महामार्ग रोखून वरील चारही तालुक्यातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले होते.
Continues below advertisement
6/9
तसेच २ नोव्हेंबरला बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने वनविभागाच्या गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून देऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती.
7/9
३ नोव्हेंबरला संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग सुमारे 18 तास रोखून धरला होता. नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक पुणे आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती. हा नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुण्याचे डॉ. सात्विक पाठक पशु चिकीत्सक, जुबिन पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात करून सदर नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दिवसभरात परिसरात ठीक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर बिबट्या दिसून आला.
8/9
टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला, परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट्या चवताळून प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री 10.30 वाजताच्या सुमारास गोळी झाडल्याने नर बिबट्या मृत झाला असून त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आले.
9/9
त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव मौजे पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले त्यानंतर सदर शव शवविच्छेदना करिता माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले अशी माहिती समोर आली आहे.
Published at : 05 Nov 2025 10:51 AM (IST)