Pune Ganeshfestival 2022: यंदा बाप्पासाठी खास 'रेनबो मोदक; पुण्याच्या शेफने तयार केले सप्तरंगी मोदक
बाप्पाच्या आगमनासाठी सध्या सगळीकडे जय्यत तयारी सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरोघरी मोदकाची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.
पुण्याच्या शेफ स्वाती इंगळे यांनी यावेळी नवनवीन प्रयोग करुन मोदक तयार केले आहेत.
त्यात रेनबो म्हणजेच सात रंगाचे मोदक सगळ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
पारंपारिक मोदकांना रंगीबेरंगी वळण देत, इंद्रधनुष्याचे मोदक यंदा लोकप्रिय व्हरायटीमध्ये रूपांतरित केले आहेत.
या सणासुदीच्या काळात केकपासून ते विविधरंगी शेकपर्यंत खाद्यपदार्थ बनवण्याच्या सोशल मीडिया ट्रेंडद्वारे प्रेरित असलेला नवीनतम आयटम, मोदकांवर देखील चांगलाच वापरता आला.
हे रंग हळदी किंवा पालक वगैरे नैसर्गिक घटकांमधून येत नाहीत. पीठ मळताना फूड-ग्रेड रंगांचा वापर करावा लागतो.
चकाकीच्या स्पर्शासाठी, एखादी व्यक्ती चांदी किंवा सोन्याचे फॉइल देखील घालू शकतात.
त्यामुळे यंदा बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य मिळणार आहे.