आवं कुठं? आपल्या पुण्यात; पहिल्यांदाच पुण्यातील बसडेपोत धावली डबलडेकर बस, प्रवाशांनी घेतला आनंद

मुंबईतील डबल डेकर बस हे अवघ्या महाराष्ट्राचं आकर्षण आहे, म्हणून गावखेड्यात आजही मुंबईतील डबल डेकर बसची चर्चा असते.

Pune first double decker bus trail

1/7
मुंबईतील डबल डेकर बस हे अवघ्या महाराष्ट्राचं आकर्षण आहे, म्हणून गावखेड्यात आजही मुंबईतील डबल डेकर बसची चर्चा असते.
2/7
कधी काळी फक्त सिनेमात पाहायला मिळणारी मुंबईतील डबल डेकर बस आता अत्याधुनिक झाली असून ई-बस मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र, आता पहिल्यांदाच पुण्यात डबल डेकर बस धावली आहे.
3/7
पुण्यात कात्रज बस डेपोमध्ये पुण्यातील पहिल्या डबल डेकर बसची ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली, त्यामुळे पुणेकरांनीही या बसमधून प्रवासाचा आनंद घेतला.
4/7
60 सिटींग आणि 25 स्टँडिंग अशी एकूण 85 प्रवाशांची क्षमता या बसची असून डबल डेकर बसला पाहायला आणि पहिल्यांदा ट्रायल रन करायलाही प्रवाशांनी गर्दी केली होती.
5/7
पहिल्या टप्प्यात पुणे महानगर परिवहन मंडळ (PMPML) च्या ताफ्यात 10 डबल डेकर बसेस देण्यात येणार आहेत. त्यामुळे, 10 विविध मार्गावर ही बस धावणार आहे.
6/7
विशेष म्हणजे पुण्यात आलेली ही डबल डेकर बस संपूर्णपणे वातानुकूलित असून ई-बस आहे. त्यामुळे, पर्यावरणपूरक अशी ही वाहतूक असणार आहे.
7/7
दरम्यान, पुढील 10-15 दिवसात याच डबल डेकर बसची पुन्हा ट्रायल रन होणार असून त्यानंतर ही पहिली डबल डेकर बस पुणेकर प्रवाशांसाठी मार्गावर धावणार आहे.
Sponsored Links by Taboola