In Pics : ओशोंना अभिवादन करु दिलं जात नसल्यानं पुण्यात भक्त आक्रमक
आचार्य ओशो रजनीश यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी ओशोंच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी देशभरातून आश्रमाच्या परिसरात दाखल झालेल्या ओशो भक्तांना आश्रम व्यवस्थापनाकडून (ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन) समाधीस्थळी जाण्यास, तसेच ओशो यांची माळ घालण्यास बंदी घालण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई उच्च न्यायालयाने भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिलेला असतानाही व्यवस्थापनाकडून मुजोरी सुरु आहे.
याविरोधात ओशो भक्तांनी गुरुवारी ओशो आश्रमाच्या गेटसमोर निषेध आंदोलन केले.
स्वामी चैतन्य कीर्ती यांच्यासोबत माँ धर्म ज्योती, स्वामी योग सुनील, माँ आरती, स्वामी मनोज व शेकडो ओशो भक्त या आंदोलनात सहभागी झाले.
आचार्य रजनीश अर्थात ओशो हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे. त्यांचे छायाचित्र असलेली माळ घालून आश्रमात प्रवेश करण्यास कोणीही मज्जाव करू शकत नाही, असं ओशो भक्तांंचं मत आहे.
मुंबई उच्च न्यायालयानेही समाधीच्या दर्शनापासून कोणत्याही भक्ताला रोखू नये, असे निर्देश दिलेले असतानाही ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या व्यवस्थापनाकडून मुजोरी सुरु आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे
आम्हाला ओशोंनी माळ दिली आहे, या विषयीचे महत्व त्यांच्या अनेक प्रवचनांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते, मग ती घालू नये असे बंधन घालणारे हे विदेशी कोण? असा सवालही भक्तांनी विचारला आहे.
अभिवादन करु देत नसल्याने भक्त आक्रमक झाले आहे.