Pune Crime : 50 तास उलटले तरिही दत्ता गाडे सापडेना, पोलिसांना शोधमोहीम सोडून माघारी परतण्याच्या सूचना

Pune Crime : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला शोधण्यात पोलिसांना सपशेल अपयश, माघारी येण्याच्या सूचना

Photo Credit - abp majha reporter

1/10
Pune : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी (दि.27) एका 26 वर्षीय तरुणीला चुकीची माहिती देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते.
2/10
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
3/10
स्वारगेट बस स्थानकासह सर्व बस स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.
4/10
दरम्यान, 48 तास उलटून गेले तरी अद्याप आरोपी दत्ता गाडेला शोधण्यात पोलिसांना अपयश आलंय.
5/10
शिरूरच्या साळुंखे फार्म हाऊस परिसरात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता.
6/10
आरोपी दत्ता गाडे हा ऊसात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
7/10
मात्र, अजूनही त्याला पकडण्यात यश आलेलं नाही.
8/10
पोलिसांसोबतच श्वानपथक देखील आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती.
9/10
मात्र, आरोपी सापडत नसल्याने अखेर पोलिसांना माघारी येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दत्ता गाडेच्या शोधमोहिमेला गेलेला पोलीस पथक आणि ग्रामस्थांच्या पथकाला परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
10/10
25 एकर परिसरातील शेतशिवाराची पहाणी करुनही दत्ता गाडेचा शोध लागला नसल्याने शोध पथकाला परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दत्ता गाडे सापडणार कधी असाही प्रश्न उपस्थित होतोय.
Sponsored Links by Taboola