Pune News: पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याचा प्रयत्न; 3 अल्पवयीन तरूणांना घेतलं ताब्यात, व्हिडीओ व्हायरल

Pune News: या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, पोलिसांकडून 3 अल्पवयीन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Pune News

1/5
कोंढव्यातील मिठानगरमध्ये टोळक्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे.
2/5
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, पोलिसांकडून 3 अल्पवयीन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
3/5
अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. त्याचा राग चौघा जणांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या कोंढव्यातील मिठानगर येथील वाहनांवर काढला.
4/5
३ रिक्षा आणि २ कारच्या काचा फोडून त्यांनी परिसरात दहशत माजविली. कोंढवा पोलिसांनी रात्रीतून चौघांपैकी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
5/5
काल शनिवारी मध्यरात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास ३ ते ४ जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी हा गोंधळ घातला.
Sponsored Links by Taboola