Photo : पुण्यात अजितदादांच्या हस्ते कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी, कोरोना नियमांची पायमल्ली
राज्यात कोरोनाची साथ आल्यापासून नियमांचं पालन करण्यात सर्वात दक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडं पाहिलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअगदी पत्रकार परिषदांच्या आधी ते सॅनिटायझर बुमवर फिरवायचे. अजित पवारांना कधीही या काळात विनामास्क पाहिलं गेलं नाही.
मात्र आज त्यांच्याच उपस्थितीमध्ये पुण्यातील एका कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला गेला.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झालं.
या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं चित्रं पाहायला मिळालं.
अजितदादा नेहमी गर्दी टाळण्याचे आवाहन करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मात्र तुफान गर्दी पाहायला मिळाली.
आजच अजित पवार यांनी निर्बंध शिथील झाल्यानंतर जिल्ह्याबाहेर फिरायला जाणाऱ्यांना इशारा दिला आहे.
फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परतल्यानंतर 15 दिवस क्वॉरन्टीन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असं अजित पवार म्हणाले.